स्वतंत्र दिनानिमित्त जमीयत कडून भव्य रक्तदान शिबिर संपन्न
स्वातंत्र्याच्या चळवळीत अग्रेसर असणाऱ्या जमियत सामाजिक कार्यातही सर्वात पुढे :
मुजतबा अहेमद खान
नेकनूर (प्रतिनिधी)
नेकनूर येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त जमीयत उलेमा-ए- हींद च्या वतीने महाराष्ट्र क्लिनिक व महाराष्ट्र मेडिकल नेकनुर येथे व जिवनदायी ब्लड सेंटर अण्ड कंपोनन्ट एफरेसीस सेंटर बीड यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत रक्तदान करून शिबिर यशस्वी केले आहे
शिबिराचे उद्घाटन जमीयत उलेमा चे मराठवाडा उपाध्यक्ष मुजतबा अहेमद खान सर यांच्या हस्ते करण्यात आले.
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले अध्याक्षीय समारोप करताना मुजतबा अहेमद खान सर म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यासाठी जमियत ही सामाजिक संस्था सर्वात अग्रेसर होती या लढ्याला हजारो उलेमानी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आज देशात जेथे कोठे आस्मानी संकट असो किंवा मानव निर्मित संकट असो जमियत उलेमा मदत घेऊन सर्वात पुढे असते जमियत कोणाची जात धर्म बघत नसुन मानव सेवा हिच ईश्वर सेवा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करत आहेत मग ते सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात ही मागे नाही शाहीन अकॅडमी बीड येथे जे हिंदू दलीत समाजाच्या गरीब मुलींना NIIT निट चे मोफत शिक्षण दिले जात असुन येथे त्यांना सर्व सुविधा सह सुरक्षिता दिली जात आहे याचा हिंदू व दलीत समाजाच्या मुलींनी लाभ घ्यावा तसेच या रक्तदाना मुळे कोणाचे तरी प्राण वाचणार आहे या पुण्याच्या कामात सर्वांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुजतबा अहमद खान सह मौलाना सय्यद साबेर अली रशिदी, माजी चेअरमन नामदेव काळे,माजी पं.स. सदस्य अनिल जाधव, पांडुरंग होमकर, जमात ए अमीर हाजी सय्यद लाईक,मुफ्ती सादेख,साहब
ग्रा.पं. सदस्य ईजहारोद्दीन जहागीरदार, मा. ग्रा.पं सदस्य तथा पत्रकार सय्यद खालेद, मकसुद पहेलवान, महादेव मुळे, सय्यद नदीम, सय्यद मुस्तखीम,जिलानी पाशा, नसीम पाशा पत्रकार सय्यद अर्शद सह आदि उपस्थित होते.यावेळी जमियत उलेमा नेकनुर शाखेच्या वतीने रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या व यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अर्शद शेख यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.मुजावर सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मौलाना साबेर यांच्या मार्गदर्शनाखाली जमीयते उलमा नेकनूर चे पदाधिकारी हाफेज अरबाज शेख साजेद,हाफेज फरहान,सय्यद अथर, सय्यद शहेबाज सय्यद आमेर, मोहसीन जहागीरदार, शेख आतीब,उमर काझी,नुमान मनियार, सय्यद उजेर,अयान शेख यांच्या सह जिवनदायी ब्लड सेंटर अण्ड कंपोनन्ट एफरेसीस सेंटर बीड यांचे सर्व कर्मचारी व जमियत चे सर्व पदाधिकाऱ्यांनी योग्य परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी केले आहे.