माध्यमिक शाळा थेरला विज्ञान नाट्य स्पर्धेत तालुक्यातून सर्वप्रथम
शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षण प्रेमी नागरिकांनी केले अभिनंदन
बीड:
नेहरू विज्ञान केंद्र भारत सरकार व शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार व जिल्हा परिषद बीड यांच्या सूचनेनुसार तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव स्पर्धा तालुका पाटोदा द्वारे आयोजित केलेल्या विज्ञान नाट्य स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा थेरला सर्वप्रथम आली आहे .
नेमून दिलेल्या विषयानुसार ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाज ‘हा विषय शाळेने निवडून सर्वच घटकांमध्ये नैपुण्य दाखवून तालुक्यातून सर्वप्रथम क्रमांक पटकाविला व जिल्हास्तरासाठी थेरला शाळा प्रतिनिधित्व करेल.
या स्पर्धेत जरेवाडी प्राथमिक शाळा द्वितीय ठरली. लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल पाटोदा तृतीय आली आहे.
तालुक्यातून सर्वप्रथम येणाऱ्या शाळेलाच जिल्हास्तरावर सादरीकरणाची संधी मिळणार असल्याने जिल्हा परिषद माध्यमिक शाळा थेरला तालुक्याचे प्रतिनिधित्व करेल .सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये मुख्याध्यापक श्री प्रताप काळे सर ,श्री सलीम तांबोळी सर, श्रीमती विनिता खेडकर मॅडम, श्री धनराज गायकवाड सर ,श्री बाळासाहेब नागररगोजे सर ,श्री विजय तांबे सर, श्री सुरेश पारवे सर ,श्रीमती लीला पोकळे मॅडम, श्रीमती रेणुका दोडके मॅडम, श्री अशोक कराड सर, श्रीमती अश्विनी खेडकर मॅडम यांनी सामुदायिक परिश्रम घेतले. त्यामुळेच हे यश प्राप्त झाले.
याप्रसंगी माननीय श्री केंद्रे साहेब ,गट विकास अधिकारी पंचायत समिती पाटोदा, माननीय श्री गव्हाणे साहेब, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पाटोदा, माननीय श्री मळेकर साहेब ,केंद्रप्रमुख तांबराजुरी, थेरला गावच्या सरपंच सौ नम्रता ताई राख आणि त्यांचे पती श्री बाळूबापू राख ,साधन व्यक्ती श्रीमती थोरवे मॅडम, श्रीमती मंगळुरे मॅडम, श्रीमती बांगर मॅडम, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षण प्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.