सामाजिक कार्यकर्ते जहांगीर पठाण याच्यावर प्राणघातक हल्ला
(बीड प्रतिनिधी):- अंबेजोगाई येथे जुन्या भांडणाच्या कारणा वरून सामाजिक कार्यकर्ते जहांगीर पठाण यांच्यावर सहा जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी अंबाजोगाई शहरात घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी फरार आहेत. या विषयी प्राप्त माहीती अशी की, येथील सामाजिक कार्यकर्ते व सदर बाजार येथील रहिवासी शराफत मिरखॉन तय्यब मिरखान उर्फ जहांगीर पठाण हे दि. ११.०६.२०२४ रोजी १२.०० वाजता एक विवाह समारंभ आटोपून केशव नगर मार्गे आपल्या घरा कडे येत असताना खोलेश्वर महाविद्यालयाच्या मागील गेट जवळ सोहेल कुरेशी रा. बाराभाई गल्ली अंबाजोगाई, आकाश नेहरकर उर्फ बिलाल रा. गांधी नगर, सय्यद मंहमद रा. झारे गल्ली, माजेद कुरेशी उर्फ माजु रा.बाराभाई गल्ली अंबाजोगाई जि. बीड, नुमान कुरेशी रा. बाराभाई गल्ली व एक अनोळखी इसमाने शराफत मिरखॉन तय्यब मिरखान उर्फ जहांगीर पठाण यास पाठीमागून येऊन त्यांची लाल रंगाची कार जहांगीर यांच्या मोटार सायकलला आडवी लाऊन आरोपी सोहेल कुरेशी याने जहांगीर यास तु खुप माजला आहेस तुझ्या भावाने आमच्यावर केस केली तु आज आमच्या कचाट्यात सापडलास आम्ही तुला जिवंत सोडणार नाहीत असे म्हणुन शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लोखंडी रॉडने (टांबी) ने मारले तर आकाश नेहरकर याने त्यांचे हातातील कोयत्याचे मुठीने डोक्यात पाठीमागुन जोरात मारले आरोपी सय्यद महंमद याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने उजवे पायाच्या नडगीवर जोरात मारले व आरोपी माजेद कुरेशी याने त्याच्या हातातील कोयत्याने डावे पायाच्या नडगीवर मारुन गंभीर जखमी केले, या सर्वांसह एका अनोळखी इसमाने लाथाबुक्याने मारहान करुन जिवे मारण्याची धमकी दिली व जहांगीर यांचा मोबाईल घेऊन आपटुन व मोटार सायकलचे नुकसान केले म्हणुन सोहेल कुरेशी रा. बाराभाई गल्ली अंबाजोगाई, आकाश नेहरकर उर्फ बिलाल रा. गांधी नगर, सय्यद मंहमद रा. झारे गल्ली, माजेद कुरेशी उर्फ माजु रा. बाराभाई गल्ली अंबाजोगाई जि. बीड नुमान कुरेशी रा. बाराभाई गल्ली व एक अनोळखी इसमा विरुद्ध शराफत मिरखॉन तय्यब मिरखान उर्फ जहांगीर पठाण यांचे फिर्यादी वरून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये गुरनं २५२/२०२४ कलम ३०७,३२६,३२४,३२३, ३४१, ४२७,१४३,१४७,१४८,१४९,५०४.५०६, भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी फरार आहेत.